लोणावळा, ता. १७ : दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोस यांच्या वतीने विशेष मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. येथील विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या संवाद शाळेत जिल्हा प्रांतपाल राजेश अग्रवाल, अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग) सुधीर कदम (डीसी मार्केटिंग अँड कम्युनिकेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विशेष मुलांनी उपस्थिती लावत कार्यक्रमातून आपला उत्साह व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान लायन्स सुप्रिमोसच्या अध्यक्ष सुरैया वाडीवाला, सचिव रंजना पुट्टोल, खजिनदार छाया वर्तक, पल्लवी शेट्टी, विश्वनाथ पुट्टोल, छाया माळी, यशश्री तावरे यांनी मुलांना भेटवस्तू व दिवाळी फराळ, मिठाई वाटप केले. तसेच सर्वांनी मिळून दिव्यांची सजावट व केक कापत आनंदोत्सव साजरा केला.