पुणे : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रब्बी हंगाम राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. धरणे आणि विहिरी तुडुंब भरल्याने पाणी टंचाई जाणवणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवापुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन, विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीबाबत आढावा बैठक झाली. भरणे म्हणाले, ‘‘राज्यात दरवर्षी सरासरी ५७ लाख हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जाते.
यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे नुकसान झाल्याने शेतकरी रब्बीकडे वळत आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली असून, धरणे आणि विहिरी पूर्ण भरल्यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात मोठी वाढ अपेक्षित आहे.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!यंदा रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू पिकाखाली सुमारे ३० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे यंदा थंडीचा कडाका वाढणार आहे. त्यामुळे गहू आणि हरभरा पिकांसाठी हा हंगाम पोषक ठरणार आहे. वाढत्या लागवडीच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खतांचे वेळेवर नियोजन आणि वितरण होण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही मंत्री भरणे यांनी सांगितले.