Diwali Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी नाही तर 'या' वेळी होणार; का बदलली वेळ?
esakal October 18, 2025 08:45 PM

Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारासाठी दिवाळी हा सण खास असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मुहूर्त ट्रेडिंगसाठी तयार आहेत. पण या वर्षी एक मोठा बदल करण्यात आला आहे. अनेक दशकांनंतर मुहूर्त ट्रेडिंगची वेळ सायंकाळवरून बदलून दुपारी करण्यात आली आहे.

‘मुहूर्त ट्रेडिंग’ म्हणजे शुभ वेळेत होणारे खास एक तासाचे ट्रेडिंग सत्र. हे सत्र हिंदू पंचांगानुसार नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी बाजार नियमित व्यापारासाठी बंद असतो, पण हे विशेष सत्र सर्व गुंतवणूकदारांसाठी खुले असते.

या सत्रात होणारे व्यवहार प्रतीकात्मक असले तरी ते वास्तविक ट्रेडिंग म्हणून नोंदवले जातात आणि नेहमीच्या नियमांनुसार सेटलमेंटहोते. अनेक गुंतवणूकदारांसाठी हे सत्र केवळ नफा कमावण्याची संधी नसून, नव्या वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्याची संधी असते.

Gold Prediction: सोनं आणखी 30 टक्के वाढणार; पुढच्या दिवाळीपर्यंत किती होणार भाव? अॅक्सिसने वर्तवला अंदाज

या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग 21 ऑक्टोबर 2025, मंगळवारी होणार आहे. प्री-ओपन सत्र दुपारी 1.30 ते 1.45 या वेळेत, मुख्य ट्रेडिंग सत्र 1.45 ते 2.45 दरम्यान, तर शेवट दुपारी 3.05 वाजता असणार आहे. यापूर्वी हे सत्र सायंकाळी साधारण 6 वाजता होत असे.

मात्र आता वेळ दुपारी केल्याने अनेक फायदे होतील, तांत्रिक सिस्टीमवरील ताण कमी होईल, नवीन सेटलमेंट नियमांशी समन्वय साधला जाईल, आणि दिवाळीच्या संध्याकाळी पूजा किंवा पारंपरिक विधी करणाऱ्यांसाठीही सोयीचे ठरेल. परदेशातील गुंतवणूकदार आणि प्रवासी भारतीयांसाठीही ही वेळ अधिक अनुकूल आहे.

Dollar Vs Rupee: रुपयाच्या घसरणीची मुख्य कारणे कोणती? डॉलरला पर्याय आहे का? गुंतवणुकीपूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

मुहूर्त ट्रेडिंगच्या आधी तयारी करणे गरजेचे आहे. डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट सक्रिय आहे का, हे तपासा. आपल्या ब्रोकरकडून ऑर्डर कट-ऑफ टाइम आणि रजिस्ट्रेशनच्या अटींबद्दल माहिती घ्या. या छोट्या सत्रात ब्लू-चिप किंवा चांगले फंडामेंटल असलेले शेअर्स निवडणे फायदेशीर ठरेल. अनुभवी गुंतवणूकदारांचासल्ला असा आहे की मुहूर्त ट्रेडिंग हे केवळ नफा मिळवण्याचे नव्हे, तर नव्या संवत्सराची सकारात्मक सुरुवात करण्याची संधी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.