Maharashtra Police Action : तळीरामांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी दारू प्याल तर घडेल अद्दल, नेमकं काय प्रकरण ?
Saam TV October 18, 2025 08:45 PM
  • शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर पोलिसांचा खाकी बडगा

  • नागरिकांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली

  • चौपाटी, नदीकिनारी आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांचे अड्डे उध्वस्त करण्यात आले

  • “उघड्यावर दारू पिऊ नका, नाहीतर कारवाई अनिवार्य” पोलिसांचा इशारा

धुळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील पोलीस तळीरामांच्या विरोधामध्ये चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे बघायला मिळाले आहे. रस्त्याच्या किनारी त्याचबरोबर चौपाटीवर नदीकिनारी तसेच सार्वजनिक ठिकाणी अड्डा बनवून सर्रासपणे दारू पिणाऱ्या तळीरामांना धुळे पोलिसांनी खाकीचा बडगा दाखवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून उघड्यावरती सर्रासपणे दारू पिणाऱ्या तळीरामांनी धुळेकरांना त्रस्तावल आहे. या तळीरामांच्या विरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. धुळ्यातील नागरिकांच्या मागणीनंतर स्थानिक पोलिसांनी आपला खाकी दम दाखवायला सुरुवात केली आणि या तळीरामांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली.

TDR File Approval : महापालिकेची मोठी घोषणा! टीडीआर प्रक्रिया आता फक्त ९० दिवसात, 'या' तारखेपासून नियम लागू होणार

महिलांची व मुलींची छेड काढणे, चैन स्नॅचिंग, तसेच चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती आणि याच अनुषंगाने धुळे पोलिसांनी या गुन्हेगारांच्या विरोधामध्ये मोहीम छेडत पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केली आहे. या तळीरामांचा अड्डा बनत चाललेले दुकान देखील पोलिसांनी उध्वस्त केले आहेत, आणि त्यानंतर या तळीरामांना धूम ठोकावी लागली आहे.

Maharashtra Rain Alert : दिवाळीत पावसाचा धुमाकूळ! कोकण-मराठवाडा अन् विदर्भाला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

आता जर तळीरामंनो घराबाहेर उघड्यावर, मोकळ्या ठिकाणी, नदीकिनारी किंवा समुद्रावर चौपाटीवर सर्रासपणे दारू पिण्याचा बेत आखत असाल तर खबरदार. कारण तुमची काही खैर नाही. तुमच्यावर आता पोलिसांचा तिसरा डोळा बारीक नजर ठेवून आहे. पोलीस अशा तळीरामांना अद्दल शिकवण्यास सुरुवात केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.