नवी दिल्लीत ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटला आग लागली आहे. इमारतीत अनेक खासदारांची घरं आहेत. विश्वंभरदास मार्गावर ही ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट आहे. ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटच्या पार्किंग परिसरात ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीचं स्वरुप लक्षात घेता अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग कशी लागली? कारण काय? ते अस्पष्ट आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. संसदेपासून काही मिनिटांच्या अंतरावर ही ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट आहे. राज्यसभेतील अनेक खासदारांची घर इथे आहेत. रुग्णावाहिका इथे पोहोचलेली आहे. या आगीत जिवीतहानी झालीय का? त्याची माहिती मिळालेली नाही. दिवाळीचा सण असल्याने फार खासदार इथे नाहीयत. पण त्यांचे पीएम, कर्मचारी इथे असताना ही आग लागलीय.
या घटनेमुळे स्थानिक लोक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये गंभीर चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. आग लागल्यानंतर 30 मिनिटं होऊनही फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नव्हत्या. या आगीत कोणीही जखमी झाल्याच वृत्त नाहीय. TMC खासदार साकेत गोखले यांनी एक्सवर लिहिलय की. “दिल्लीच्या BD मार्गावरील ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली आहे. सर्व राज्यसभा खासदार इथे राहतात. इमारत संसद भवनापासून 200 मीटर अंतरावर आहे. 30 मिनिटापर्यंत एकही फायर ब्रिगेडची गाडी आली नाही. आग अजूनही असून वाढत आहे. वारंवार कॉल करुनही फायरब्रिगेडच्या गाड्या गायब आहेत. दिल्ली सरकार थोडी तरी लाज वाटू द्या”
‘माझा कुत्रा आतमध्ये फसला आहे’
आग लागलेल्या इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या विनोदने सांगितलं की, “माझा कुत्रा आतमध्ये फसला आहे. माझ्या मुलीच लग्न काही महिन्यात होणार आहे. जे दागिने, कपडे आम्ही विकत घेतलेले ते आतमध्ये आहेत. माझी पत्नी आणि मुलगा जळाला. ते रुग्णालयात आहेत. ही आग कशी लागली माहित नाही. माझं घर तिसऱ्या मजल्यावर आहे”
#WATCH | Delhi | Vinod, a resident of Brahmaputra apartments, says, “… My dog was stuck inside. My daughter is about to be married in a matter of months, and all the jewellery, gold, and clothes we had bought are also inside… My wife and one of my children also suffered… pic.twitter.com/MwwGU6P7fM
— ANI (@ANI)
हा खूपच संवेदनशील आणि महत्वपूर्ण सरकारी भाग
हा खूपच संवेदनशील आणि महत्वपूर्ण सरकारी भाग आहे. असं असताना तिथे आग लागणं आणि फायरब्रिगेडच्या गाड्या उशिराने पोहोचणं यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आगीमुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती नाहीय. आग का लागली? त्यामागची कारणं समजू शकलेली नाहीत. फायर ब्रिगेडचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.