ओबीसी नेत्यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे महाएल्गार सभा आयोजित करीत मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांना आव्हान दिले. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना आमच्या ओबीसींच्या बोकांडी बसवण्याचा प्रयत्न का केला जात आहे असा सवाल केला. छगन भुजबल यांनी मराठा आंदोलक नेते जरांगे पाटील यांचा ‘दरिंदे पाटील’ असा उल्लेख करीत त्यांच्या मोठी टीका केली आहे. यावर आता जरांगे पाटील आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
ओबीसी समाजाच्या एल्गार सभेनंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, हे बीडमध्ये येऊन दहशत निर्माण करीत आहेत, आता मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणच्याही असल्या दबावाला भितही नाही.मराठ्यांनाही आपल्या लेकरांचे भवितव्य वाचवण्यासाठी यांना तोडीस तोड उत्तर द्यावेच लागणार आहे. बीडची ही पवित्र भूमी महाराष्ट्राचा दिशा दर्शक होऊ शकतो असेही जरांगे यावेळी म्हणाले.
पण आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणारबीड जिल्ह्यातून दिशा देण्याची ताकद मराठ्यांना दाखवावी लागणार आहे. परंतू यांचे जे स्वप्न आहे मराठ्या भीती आणि दहशत दाखवण्याची आणि जातीय दंगली घडवून आणायच्या हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ द्यायचे नाही. आपण सुद्धा यांना ताकद दाखवलीच पाहिजे. भुजबळ यांनी तुमचा दरिंदे पाटील असा उल्लेख केला आहे असे विचारता जरांगे पाटील म्हणाले की ते काहीही बरळतंय अक्कल दाढ पडलीय त्याची. घुरट सगळीकडे वास दरवळत हिंडतंय तसं भुजबळ यांचे झाले आहे. आणि स्वत:च्या चक्रव्युहात ओबीसी नेत्यांना घेऊन त्याचा ते देव्हारा करु लागले आहे. तुम्ही किती दडपण आणायचा प्रयत्न करा पण आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा दावा जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
तुझा रक्ताळलेला चष्मा नकोबीडचे मराठे एवढे कच्चे नाहीत तेवढे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी यावेळी दिला. धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील हे आपला परळीचा चष्मावाला असा उल्लेख करताय. त्यावर मुंडे यांनी आपला चष्मा द्यायला तयार असे सांगितले आहे असे विचारता जरांगे यांनी तुझा चष्मा कोणी मागितला. तो तुलाच ठेव, तुझ्या चष्म्याने काय केलेय हे लोकांनी बघितले आहे. तुझा रक्ताळलेला चष्मा नको असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.