अडगाव: लगतच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नरनाळा वनविभागांतर्गत येणाऱ्या खैरखेड या गावात गेल्या आठ दिवसांपासून दोनतीनदा नजरेस पडलेल्या वाघामुळे दहशत निर्माण झाली आहे.
गुरुवारी (ता.१६) गावालगतच्या कैलास मेतकर यांच्या डेअरी फॉर्मजवळ वाघाने चक्कर मारल्याची बाब डेअरी फॉर्ममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपल्या गेली. त्यामुळे व वाघाच्या पायांचे ठसे उमटले गेल्याने गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Tiger In Sindhudurg : 'या' गावांत वाघाच्या डरकाळ्या, वनविभागाकडून बसविण्यात आले ४ ट्रॅप कॅमेरे; पट्टेरी वाघाचे आढळले ठसे...यामुळे शेतमजुरांमध्ये सुद्धा शेतात कामाला जायला धास्ती निर्माण झाल्याने, ऐन हंगामात शेतातील कामावर व मजुरांच्या मंजुरीवर याचा विपरित परिणाम झाला असून, खैरखेड परिसरात ऐन दिवाळीत एक नवीन समस्या निर्माण झाली आहे.
याबाबत वनविभागाला सीसीटीव्ही फुटेज व पायाचे ठसे याबाबत माहिती दिली आहे. यावर वनविभागाने तत्परतेने उपाय करुन खैरखेड परिसरातील निर्माण झालेल्या परीस्थितीबाबत योग्य ती कार्यवाही करावी व घबराट दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाघाच्या या परिसरातील वास्तव्याने गावातील गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेच्या जनावरांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे.
Premium|Satpura Tiger Reserve: सातपुडा व्याघ्र प्रकल्प; निसर्गाच्या कुशीत वाघांच्या सहवासातखैरखेड परिसरात नागरिकांनी संध्याकाळनंतर एकट्याने बाहेर निघू नये तसेच शेतात शक्यतो खाली बसायचे काम न करता सतर्कता बाळगावी. शेतात फिरताना आवाज येईल अशा प्रकारचे वातावरण ठेवावे. वनविभागाकडून आजपासून त्या परिसरात जास्तीची गस्त सुरू करीत आहोत. याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल.
- हर्षाली रिठे (तराळे), आर.एफ.ओ., नरनाळा रेंज