पुणे: शहरातील वाढत्या श्वानदंशाच्या घटनांना आळा घालण्यासाठी भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याबरोबरच भटक्या श्वानांना जीपीआर मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दिल्ली, गोव्यापाठोपाठ आता पुण्यातही हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानुसार, महापालिकेच्या हद्दीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ६०० श्वानांना मायक्रोचिप बसविली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून मायक्रोचिप बसविण्यास सुरुवात केली जाणार आहे.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवाकेंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार, महापालिकेने २०३० पर्यंत शहर रेबीजमुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. मागील काही दिवसांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत लहान मुलांना श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, शहरातील नसबंदी शस्त्रक्रिया न झालेल्या श्वानांचे लसीकरण करून त्यांना मायक्रोचिप बसविण्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागास एका खासगी कंपनीकडून प्रायोगिक तत्त्वावर ६०० मायक्रोचिप मोफत देण्यात आल्या आहेत.
या मायक्रोचिप प्राणी मित्र संस्थांच्या संपर्कात असलेल्या व नसबंदी शस्त्रक्रिया न झालेल्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करताना संबंधित मायक्रोचिप बसविली जाणार आहे. मायक्रोचिप बसविल्यानंतर संबंधित श्वानांचे एक आठवडा निरीक्षण केले जाणार आहे. मायक्रोचिप यंत्रणा व्यवस्थित कार्य करते आहे किंवा नाही, याची तपासणी केल्यानंतरच संपूर्ण शहरामधील भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसविण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पुण्याच्या जुन्या हद्दीसह समाविष्ट ३२ गावांमधील श्वानांची माहिती महापालिकेस मिळणे शक्य होणार आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या खासगी संस्थेमार्फत हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात! जीपीआर मायक्रोचिपची वैशिष्ट्येमायक्रोचिप तांदळाच्या आकाराची असेल, त्याला १५ अंकी युनिक नंबर मिळणार
मायक्रोचिपमध्ये श्वानाचा रंग, वय, नसबंदी शस्त्रक्रियेची माहिती असेल
श्वानाचा परिसर, रेबीज, नसबंदी शस्त्रक्रिया याचाही उल्लेख होणार
मायक्रोचिप श्वानाच्या खांद्यामध्ये इंजेक्शनद्वारे बसविली जाणार
मायक्रोचिपमध्ये आयएफडी तंत्राचा वापर, चीप स्कॅन केल्यानंतर श्वानाबद्दल मिळणार इत्थंभूत माहिती
दिल्ली, गोवा, जयपूर, बंगळुरू या शहरांत प्रयोग सुरू