१८ ऑक्टोबर २०२५ साठी
शनिवार : आश्विन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.२६ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय पहाटे ४.२४ चंद्रास्त दुपारी ४.१०, धनत्रयोदशी, शनिप्रदोष, गुरुद्वादशी, धन्वंतरी जयंती, यमदीपदान, भारतीय सौर आश्विन २६ शके १९४७
दिनविशेष२०१५ : मराठी रंगभूमीवर इतिहास घडविणाऱ्या आणि मालवणी बोली सातासमुद्रापार नेणाऱ्या ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांची ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.
२०१५ : जमैका येथील मार्लन जेम्स या अवघ्या ४४ वर्षांच्या लेखकाच्या पुस्तकाला ‘मॅन बुकर पुरस्कार’ जाहीर