Beed News: शेतकरी कुटुंबीयास मारहाण करून सोन्या चांदीसह पावणे सहा लाखांचा ऐवज केला लंपास,गेवराईच्या सुशी गावातील घटना!
esakal October 19, 2025 07:45 AM

गेवराई: घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत आज्ञात चोरट्यांनी शेतकरी कूटूबिंयास मारहाण करुन सोने,चांदीसह अन् नगदी रक्कम यासह एकुण पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना परवा गूरुवारी पहाटे गेवराईतील सुशी गावात घडली

बुधवारी दिवसभर शेतात काम करुन रात्री दिलीप निवृत्ती पौळ त्यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असतानाच गुरूवारी साधारण दोन वाजेच्या सुमारास आज्ञात चोरट्यांनी घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेतून ३ कोटींच्या सोन्याची बॅग लंपास; बडनेरा रेल्वे स्थानकावर सराफा व्यावसायिकाला मोठा धक्का

शेतकरी दिलीप पौळ व त्यांच्या पत्नी वृंदावनी पौळ यांना जबर मारहाण करत घरात ठेवलेल्या लोखंडी पेटीत असलेले नऊ तोळे सोने व १४ भार चांदीसह नगदी रोकड असा एकुण जवळपास ५ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

याबाबत शेतकरी दिलीप पौळ यांच्या पत्नी वृंदावनी दिलीप पौळ यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिस ठाण्यात आज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ यांच्या मार्गदर्शनात फौजदार आढाव या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Gold Theft: बडनेरा रेल्वेस्थानकावर कोट्यवधींची सोन्याची चोरी; दोन किलो दागिने बेपत्ता
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.