डीजीपीनगर: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देत म. रा. वि. मं. मित्रमंडळातर्फे (अशोका मार्ग परिसर) अध्यक्ष अरुण मराठे, उपाध्यक्ष राजेंद्र हिंगे, सचिव अशोक शिंदे, सहसचिव शशिकांत सोमवंशी यांनी रोख २१ हजारांची मदत गुरुवारी (ता. १६) ‘सकाळ’चे निवासी संपादक अभय सुपेकर यांच्याकडे सुपूर्द करीत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या वेळी ‘जगाचा पोशिंदा जगला पाहिजे’ अशा भावना निवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.
२००५ ते २००८ या कालावधीत अशोका मार्ग व रविशंकर मार्ग परिसरात वास्तव्यास आलेल्या म. रा. वि. मं. कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना व निवृत्तीनंतर सुख-दुःखाच्या प्रसंगी आपल्या सहकाऱ्यांना तत्पर मदत व्हावी, या उदात्त हेतूने या मंडळाची स्थापना २६ जानेवारी २०१० ला केली. मंडळातर्फे दिवाळी सणानिमित आदिवासी पाड्यावर फराळ वाटप, आरोग्य शिबिर, स्नेहमेळावा असे विविध उपक्रम राबविले जातात.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी या ज्येष्ठांनी पुढाकार घेत मदत सुपूर्द केली. या वेळी सल्लागार के. जे. पाटील, शेखर पाटील, ए. के. जैन, अध्यक्ष अरुण मराठे, उपाध्यक्ष राजेंद्र हिंगे, सचिव अशोक शिंदे यांच्यासह सचिव शशिकांत सोमवंशी, खजिनदार पुरुषोत्तम गांगुर्डे, सदस्य जे. डी. भालेराव, उल्हास अत्तरदे उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद विद्यालयाचा पुढाकार
डीजीपीनगर : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी प्रत्येक वर्गातून संकलित केलेला ६००५ रुपयांचा निधी मुख्याध्यापक रत्नाकर वेळीस, ज्येष्ठ शिक्षक अशोक पाटील, भावना नाईक, योगेश कड, सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी ‘सकाळ रिलीफ फंड’साठी बातमीदार संदीप पवार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या या विधायक कार्याचे पालकांकडून कौतुक होत आहे. अभ्यासाबरोबर मुलांमध्ये समाजभान व सामाजिक बांधिलकीचे संस्कार मुलांच्या मनावर बिंबविण्यात शाळेचे योगदान आदर्शवत असल्याच्या भावना पालकांनी व्यक्त केल्या.
Javali politics:'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला सदाशिव सपकाळ'; निवडणुकीच्या तोंडावर विविध प्रश्नांवर चर्चा; जावळी तालुक्यात खळबळमुख्याध्यापक वेळीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका वैशाली गांगुर्डे, महेश पगार, ज्योती पवार, समीधा पाठक, रविता पवार, अशोक पाटील, रेणुका पवार, मानसी म्हसदे, भावना नाईक, योगेश कड, दीपक भोये, हर्षद गोसावी, योगेश पाटील, तृप्ती पाटील, कस्तुरी डावखरे, स्नेहल शुक्ला, वृषाली निकम, नंदा खरात, संगीता राख आदींसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निधी संकलनासाठी परिश्रम घेतले. पालक रमेश कोल्हे यांनी १५०० रुपये व शिक्षक योगेश कड यांनी ५०० रुपयांची याआधी मदत केली आहे.