वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र या सामन्यात दोन वेळा पावसाचा व्यत्यय आला. पाकिस्तानने 25 षटकात 5 गडी गमवून 95 धावा केल्या होत्या. मात्र तेव्हा जो पाऊस आला त्याने काही उसंत घेतली नाही. त्यामुळे 9 वाजून 40 मिनिटांपर्यंत शेवटची ठरवण्यात आली. मात्र पाऊस जाण्याची चिन्ह नसल्याने त्याआधीच सामना ड्रॉ झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पाकिस्तानची स्थिती पाहता खरं तर हा एक गुण फुकटचा मिळाला. पण न्यूझीलंडची उपांत्य फेरीची वाट मात्र बिकट झाली आहे. आता भारत इंग्लंड या सामन्यावर न्यूझीलंडचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईनने सांगितलं की, ‘तुम्हाला असे वाटेल की आम्ही आज चांगल्या स्थितीत होतो, तुम्हाला फक्त थांबण्यासाठी पावसाची आवश्यकता होती. पण दुर्दैवाने, आज ते घडले नाही. हे अत्यंत निराशाजनक आहे. तुम्ही विश्वचषकासाठी चार वर्षे वाट पाहता आणि त्यात पावसाचा इतका मोठा वाटा असणे निराशाजनक आहे. मला वाटते की, भविष्यातील आवृत्त्यांमध्ये, सामना लवकर खेळ सुरू करण्याचा विचार करतील. आपण येथे पाहिले आहे की पाऊस सहसा दुपारी येतो. त्यामुळे हे सामने सकाळी 10 किंवा 11 वाजता खेळण्याची संधी आहे. कारण सर्व संघांना क्रिकेट खेळायचे आहे. तुम्ही येथे येण्यासाठी खूप वाट पाहिली आहे, तुम्हाला सर्वोत्तम संघांविरुद्ध स्वतःची चाचणी घ्यायची आहे. पावसाने अडथळा आणणे माझ्यासाठी खरोखरच त्रासदायक आहे.’
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना म्हणाली की, ‘पॉवरप्लेमध्ये आम्हाला चांगली सुरुवात मिळाली, पण आम्ही काही विकेट्स गमावल्या. आम्हाला असे वाटले की जर आम्ही 180 च्या आसपास धावा काढू शकलो असतो तर आमचे गोलंदाज त्यांना रोखू शकले असते. आमच्या सर्वांना आमच्या गोलंदाजी संघावर चांगला विश्वास आहे. ते खरोखर चांगले प्रदर्शन करत आहेत. पण वाटते की खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली होती आणि आमच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली ती अद्भुत होती. आमच्या गोलंदाजी आक्रमणावर आमचा दृढ विश्वास आहे, म्हणून आशा आहे की, पुढील सामन्यांमध्ये आम्हाला ते पुन्हा दाखवण्याची चांगली संधी मिळेल.’