-ratchl१८१.jpg-
२५N९९३६७
चिपळूण ः प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या महिला.
-------
चिपळुणात महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः भाजपच्या चिपळूण शहर मंडलतर्फे शहरातील नऊ प्रभागात महिला, युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण घेण्यात आले. शिबिराचा लाभ २७७ महिलांनी घेतला. शिबिर शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
चिपळूण शहरातील युवती व महिला यांना घरबसल्या मोकळ्या वेळेत स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा तसेच घरातील तिचा सन्मान वाढावा या हेतूने हे प्रशिक्षण आयोजित कले होते. शिबिरात मोत्याचे दागिने, आकाशकंदील, विविध प्रकारच्या हस्तकला दाखवण्यात आल्या. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून जास्तीचा नफा मिळतो, हेही दाखवण्यात आले. प्रशिक्षिका उमा म्हडदळकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी जिल्हा सरचिटणीस प्रणाली सावर्डेकर, शहराध्यक्ष महिला मोर्चा रसिका देवळेकर, सारिका भावे, वैशाली निमकर, अश्विनी वरवडेकर, शीतल रानडे आदींनी मेहनत घेतली.