पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तणावात मोठी बातमी! कतारची मध्यस्थी, तात्काळ युद्धबंदीवर…
Tv9 Marathi October 19, 2025 04:45 PM

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर मोठा तणाव बघायला मिळाला. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला उत्तर देताना अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या तब्बल 58 सैनिकांना ठार केले आणि सात सैनिकांना ओलिस ठेवले. हा संघर्ष प्रचंड वाढताना दिसला. दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन साैदी अरेबिया आणि कतारने केले. मात्र, तणाव वाढताना दिसला. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी पहाटे जाहीर केले की, कतारमधील दोहा येथे झालेल्या चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अफगाणिस्तान पाकिस्तानच्या तणावात कतारने मध्यस्थी केल्याचे बघायला मिळतंय.

पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धबंदीवर सहमत 

रिपोर्टनुसार, कतारने सांगितले की, युद्धबंदी कायमस्वरूपी आणि योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी पुढील काही दिवसांत दोन्ही बाजूंनी अधिक बैठका घेणार असल्याचे मान्य केले. अफगाणिस्तान ज्याप्रकारे पाकिस्तानच्या विरोधात  मैदानात उतरला त्यानंतर पाकच्या सैन्याला पळो की सळो करून सोडले. संरक्षण मंत्री मुल्ला मुहम्मद याकूबह बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबान प्रतिनिधींसोबत चर्चा केली.

कतारला करावी लागली दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी 

पाकिस्तान अफगाणिस्तान तणावात पाकने भारतावर गंभीर आरोप केली होती. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, या बैठकीचा मुख्य उद्देश हा आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानातून पाकिस्तानमध्ये सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवणे हा आहे. तालिबानने पाकिस्तानचा हा आरोप खोटा असल्याचे म्हटले. पाकिस्तानवर अफगाणिस्तानला अस्थिर करण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप आहे.

सीमेवरील तणाव कमी होण्याचे मोठे संकेत 

शेवटी आता कतारच्या मदतीने दोन्ही देश युद्धबंदीसाठी सहमत झाली आहेत. साैदी अरेबिया आणि कतार यांनी केलेल्या आवाहनानंतरही मोठे हल्ले दोन्ही देशांनी एकमेकांवर केली होती. पाकिस्तानच्या 25 सैन्य चाैक्या सध्या अफगाणिस्तानच्या ताब्यात आहेत. दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या पुढील बैठकांमध्ये कदाचित यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यासर्व गोष्टींमध्ये भारताने सध्या आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये. अफगाणिस्तान आणि भारतामध्ये संबंध गेल्या काही दिवसांपासून मजबूत होताना दिसत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.