-ratchl१८२.jpg ः
P२५N९९३६८
चिपळूण ः सांस्कृतिक महोत्सवात कलागुण सादर करताना पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी.
-----
चिपळुणात रंगला सांस्कृतिक महोत्सव
चिपळूण नागरीचा वर्धापनदिन : अधिकारी, कर्मचाऱ्यांची धम्माल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सांस्कृतिक महोत्सव उत्साहात झाला. या महोत्सवात संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, वाशिष्ठी डेअरी परिवाराने जल्लोषात सहभाग घेतला. संगीत, नृत्य, नाट्य, हास्य आणि भावनांच्या आविष्काराने सजलेली ही संध्याकाळ संस्मरणीय ठरली.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात संचालिका स्मिता चव्हाण यांच्या ऐ मालिक तेरे बंदे हम, या गीताने झाली. त्यानंतर पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगमंचावर विविध सादरीकरणांद्वारे रंगत वाढत नेली. एकापाठोपाठ एक सादर झालेल्या गाणी, नृत्य, नाटिका, गटगान, विनोदी स्किट या सर्वांनी सभागृह दणाणून टाकले. गोंधळ, लावणी, रिमिक्स अशा विविध बहारदार कार्यक्रमांनी उपस्थितांना ठेका धरायला लावला. संस्थेच्या विविध शाखांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे कलागुण सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली. वाशिष्ठी डेअरीच्या कर्मचाऱ्यांचे नृत्य व गीत हे विशेष आकर्षण ठरले. संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त रंगलेल्या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, स्वामिनी यादव आदी उपस्थित होते.