दिवाळीनिमित्त 'अमराळे ज्वेलर्स'कडून खास सवलत
esakal October 21, 2025 01:45 PM

पुणे, ता. २० : दिवाळीनिमित्त अमराळे ज्वेलर्सने ग्राहकांसाठी एक खास सवलत जाहीर केली आहे. ५० हजार रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर एक सुंदर अशी साडी ग्राहकांना भेट मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेत ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही सवलत अमराळे ज्वेलर्सच्या लक्ष्मी रस्ता, पिरंगुट आणि हडपसर या तिन्ही दालनात लागू आहे.
विश्वासाने खरेदी करावे, असे सुवर्ण दालन... या सुवर्ण दालनाला २९ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. ग्राहकांसाठी सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने बनविणारी ही एक लोकप्रिय पेढी आहे. ज्यामध्ये दागिने डिझायनरद्वारा डिझाइन करून दिले जातात. प्रत्येक दागिना उत्तम कलाकुसर कशी होईल यात स्वतः स्वप्नील अमराळे जातीने लक्ष देतात. अमराळे ज्वेलर्सची सुवर्ण संचय योजना ही एक पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे. ज्यामध्ये आपण दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा करून वर्षअखेर आपल्या आवडीचा दागिना बनवू शकता. ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन ‘अमराळे ज्वेलर्स’चे संचालक धनश्री अमराळे आणि श्रद्धा अमराळे यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.