'कांतारा चॅप्टर १' अजूनही पाहिला नाही? आता घरबसल्या पाहता येणार; 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
esakal October 19, 2025 02:45 PM

ऋषभ शेट्टी याचा 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाने ४९० कोटींचा गल्ला जमवलाय. येत्या आठवड्यात हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. मात्र अजूनही अनेकांनी हा चित्रपट पाहिला नाहीये. त्यामुळे हा सिनेमा नेमकी किती कमाई करतो त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र या आठवड्यात 'थम्मा', 'एक दीवाने की दिवानीयत' आणि इतर चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या आठवड्यानंतर 'कांतारा'ची कमाई कमी होऊ शकते. मात्र 'कांतारा: चॅप्टर १' चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी खेचत असतानाच, त्याच्या डिजिटल रिलीजबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

थिएटरमध्ये धुमाकूळ घालत असताना प्रेक्षक आता हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहेत. आता ‘कांतारा चॅप्टर १’ची ओटीटी रिलीज डेट समोर आली आहे. चला जाणून घेऊया हा चित्रपट कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. पिंकव्हीलाच्या माहितीनुसार, हा चित्रपट Amazon Prime Video वर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे आणि तो कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम यांसारख्या अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होईल. प्राइम व्हिडीओकडे ‘कांतारा चॅप्टर १’चे डिजिटल हक्क आहेत आणि हा चित्रपट या महिन्याच्या अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो असं इंडस्ट्रीतील सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

हा चित्रपट ३० ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे अशी माहिती आहे. प्राइम व्हिडीओने चित्रपटाच्या निर्मात्यांशी १२५ कोटी रुपयांचा करार केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘केजीएफ’नंतरचा दुसरा सर्वांत महागडा कन्नड चित्रपट बनला आहे.

कुणी बघितलं तर मी नाही बनणार... अनारस्यांबद्दल पृथ्वीक प्रतापने सांगितलेली गंम्मत तुम्हाला ठाऊक आहे का?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.