रणजित माजगावकर
कोल्हापूर : रात्रीच्या वेळी घरात असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला. यात वृद्ध पती- पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कोल्हापूरतालुक्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात सदरची घटना घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात रुक्मिणीबाई कंक (वय ७०) आणि निनो कंक (वय ७५) या वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कंक हे वृद्ध दाम्पत्य जंगल परिसरात असलेल्या धरणाजवळ वास्तवास होते. या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच पाहण्यास मिळत असून परिसरात नेहमीच भीतीचे वातावरण असते. ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूकघरात असलेल्या दाम्पत्यावर हल्ला
दरम्यान धरणाजवळ राहणाऱ्या या दांपत्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केला. यात रुक्मिणीबाई यांना फरपटत नेऊन त्यांच्या शरीराचे लचके तोडले. तर निनो कंक यांना धरणाच्या पाण्यात फरफटत नेले होते. दाम्पत्याची ताकद कमी पडल्याने बिबट्याने दोघांनाही भक्ष बनविले. सकाळी काही गावकऱ्यांना सदर घटना निदर्शनास आली. यानंतर या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं शाहूवाडी वनविभाग आणि पोलिसांना कळवले.
Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलनबंदोबस्त करण्याची मागणी
माहिती मिळल्यानंतर वनाधिकारी उज्वला मगदूम आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. यावेळी बिबट्याचे पंजांचे ठसे आढळले, ज्यामुळे हल्ला बिबट्याचाच असल्याचे निष्पन्न झालं. शाहूवाडी तालुक्यात वारंवार होणाऱ्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण पसरलंय. नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली जात आहे.