कच्ची केळी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे आणि ते दिवसभर शरीर सक्रिय ठेवते. त्यात हेल्दी स्टार्च आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कच्ची केळी नियमित खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
बद्धकोष्ठतेपासून सुटका: कच्च्या केळ्यामध्ये फायबर आणि हेल्दी स्टार्च असते, जे बद्धकोष्ठतेसाठी उपयुक्त ठरते. यामध्ये असलेले फायबर आणि इतर पोषक घटक भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, त्यात कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करते आणि मूड स्विंगच्या समस्यांमध्ये देखील फायदेशीर आहे.
पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, बी1, बी2 आणि व्हिटॅमिन सी यांसारखे महत्त्वाचे पोषक तत्व केळीमध्ये आढळतात. त्यात पाण्याचे प्रमाण कमी असते. केळीमध्ये दीड टक्के प्रथिने, तीन टक्के जीवनसत्त्वे आणि २० टक्के कर्बोदके असतात. याशिवाय लोह, तांबे आणि कॅल्शियम देखील असतात.
कच्च्या केळ्याचा थंड प्रभाव असतो, त्यामुळे कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ते हानिकारक ठरू शकते. जर कोणाला सर्दी, खोकला किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्याचे सेवन करू नये. ॲलर्जीच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन करावे.