अंबड : जालना जिल्हयातील अंबड -जालना महामार्गावरील लालवाडी फाट्याजवळ शनिवारी (ता.18) सकाळी साडे नऊ वाजता मंठा तालुक्यातील गेवराई येथील गोविंद लक्ष्मण गिऱ्हे (वय 20) वर्ष हा तरुण जालना शहराकडून अंबडकडे जात असताना अंबडकडून जालना शहराकडे जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला महामार्गावरून खाली खड्यात फरफटत घेऊन जात चिरडले आहे.
यामध्ये गोविंद गिऱ्हे हा वीस वर्षीय युवक जागीच गतप्राण झाला आहे. कंटेनर चालकाने घटनास्थळावरून तात्काळ पलायन केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले.
Karad Crime: 'कऱ्हाडात हॉटेलमध्ये पती- पत्नीस मारहाण'; शेजारील टेबलवर दारू पीत असणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखलयुवकाची बॉडी काढून अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत श्र्ववीचेदन करून बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दिली.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश नरवडे हे करत आहे.