रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीचं एकदिवसीय संघात 7 महिन्यांनंतर कमबॅक झालं. या दोघांनीही चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलनंतर पहिला एकदिवसीय सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला. मात्र दोघांनाही कमबॅकनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आलं. विराट आणि रोहित या दोघांनंतर आता आणखी एका खेळाडूचं एकदिवसीय संघात 7 महिन्यांनी पुनरागमन झालं आहे. या खेळाडूनेही त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना हा 9 मार्च चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनिमित्ताने खेळला होता.
इंग्लंड क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात सध्या 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मिचेल सँटनर न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
अनुभवी फलंदाज आणि केन विलियमसन याला एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच ऑलराउंडर नॅथन स्मिथ याचंही कमबॅक झालं आहे. नॅथन वैद्यकीय कारणांमुळे टीममधून बाहेर होता. तर केन चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर टीममधून बाहेर होता. तसेच स्मिथ ऑगस्टनंतर टीममध्ये परतला आहे. स्मिथला ऑगस्ट महिन्यात झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पोटाला दुखापत झाली होती.
दरम्यान न्यूझीलंड क्रिकेट टीममधील तब्बल 6 खेळाडूंना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. न्यूझीलंडचे 1, 2 नाही तब्बल 6 खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात अडकले आहेत. या 6 खेळाडूंमध्ये फिन एलन, लॉकी फर्ग्यूसन, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, बेन सीयर्स आणि एडम मिल्ने याचा समावेश आहे.
पहिला सामना, रविवार, 26 ऑक्टोबर, माउंट मौंगानुई
दुसरा सामना, बुधवार, 29 ऑक्टोबर, हॅमिल्टन
तिसरा सामना, शनिवार, 1 नोव्हेंबर, वेलिंग्टन
न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ
इंग्लंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, कायल जेमीसन, टॉम लॅथम (विकेटकीपर), डॅरेल मिचेल, रचीन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विलियमसन आणि विल यंग.