वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 20 सामन्यांचा खेळ संपला आहे. यातून तीन संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांना उपांत्य फेरीत जागा मिळाली आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी पाच संघ शर्यतीत आहेत. सर्वच संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले असून दोन सामने शिल्लक आहे. दुसरीकडे अजूनही या स्पर्धेतून कोणताच संघ उपांत्य फेरीसाठी अपात्र ठरलेला नाही. म्हणजेच पाचही संघांना तितकीच संधी आहे. खरं तर चौथ्या जागेसाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. त्यात या दोन संघ दोन पैकी एका सामन्यात भिडणार आहे. या सामन्याच्या निकालावर उपांत्य फेरीचं गणित जवळपास स्पष्ट होणार आहे. टीम इंडिया चौथ्या स्थानावर असून 4 गुण आणि +0.526 नेट रनरेट आहे. त्यामुळे भारताने उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर जाग निश्चित होईल. पण एका सामन्यात विजय आणि एका सामन्या पराभव झाला तर मात्र गणित जर तरवर येईल. भारतीय संघाचं संपर्ण समीकरण समजून घेऊयात.
भारताचे या स्पर्धेतील दोन सामने शिल्लक असून न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. यातील न्यूझीलंडविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण या दोन संघात चौथ्या जागेसाठी तगडी स्पर्धा आहे. भारताप्रमाणे न्यूझीलंडचेही 4 गुण आहेत. पण त्यांचा नेट रनरेट हा -0.245 इतका असल्याने पाचव्या स्थानावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साममा 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना गमावणाऱ्या संघाला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी चमत्काराची आशा बाळगावी लागणार आहे. भारताचा या स्पर्धेतील शेवटचा सामना 26 ऑक्टोबरला बांगलादेशशी होणार आहे.
न्यूझीलंडचा दुसरा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 26 ऑक्टोबरलाच होणार आहे. त्यामुळे हा दिवस दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरेल. म्हणजेच 23 तारखेला भारत न्यूझीलंड सामन्यात पराभूत होणारा संघ 26 ऑक्टोबरपर्यंत आशेवर असेल. कारण पराभूत होणाऱ्या संघाला 26 तारखेपर्यंत आशा असतील. जर 23 तारखेला विजया झालेला संघ 26 तारखेला पराभूत झाला आणि 23 तारखेला पराभूत झालेला संघ विजयी झाला तर मात्र गणित नेट रनरेटवर येऊन ठेपेल. नेट रनरेट चांगला असलेल्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. पण यातही बांग्लादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेपैकी ज्याचे 6 गुण असतील त्याचा नेट रनरेट महत्त्वाचा असेल.