आमदाराच्या खास माणसाचे घाणेरडे चाळे, महिलेसोबत अश्लील डान्स, कॅमेऱ्यात कैद झालेला प्रकार व्हायरल!
Tv9 Marathi October 20, 2025 08:45 PM

नेहमी वादविवादांमुळे चर्चेत असलेल्या अयोध्या जिल्ह्यातील रुदौली विधानसभा क्षेत्रातील आमदार रामचंद्र यादव पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कारण आहे त्यांचा प्रतिनिधी कृष्ण सागर पाल यांचे अश्लील व्हिडीओ. हे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंची चर्चा आता राजकीय गल्लीपर्यंत पोहोचली आहे.

काय आहे व्हिडीओ?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आमदारांचे प्रतिनिधी एका महिलेसोबत अश्लील नृत्य करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते एका खोलीत बेडवर बसलेले दिसत आहेत. तिथे अनेक महिला उपस्थित होत्या आणि आमदारांचे प्रतिनिधी बिअर पिताना दिसत आहेत. मात्र, या व्हिडीओंची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही.

वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…

अयोध्या

पोस्ट शेअर करणाऱ्याला धमकी

सोशल मीडियावर ज्या आयडीवरून हे सर्व व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करण्यात आले आहेत, त्याच आयडीवरून एका संभाषणाचा स्क्रीनशॉटही पोस्ट करण्यात आला आहे. यात आमदार साहेबांच्या नावाचा उल्लेख ताबडतोब काढून टाकण्याची आणि पोस्ट केलेले व्हिडीओ फोटोंना डिलीट करण्याची चर्चा झाली आहे. यावर युजरने लिहिले आहे की, माझ्यावर पोस्ट डिलीट करण्याचा दबाव टाकला जात आहे आणि धमकीही दिली जात आहे.

यासोबतच असंही लिहिले आहे की मला धमकी दिली जात आहे की जर पोस्ट डिलीट केली नाही तर माझ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर युजरच्या या पोस्टवर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. सध्या आमदार आणि त्यांच्या प्रतिनिधीकडून या व्हिडीओंवर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.