दारूच्या नशेत कोयत्याने वार
खालापूर, ता. १९ (बातमीदार)ः दारूच्या नशेत असलेल्या पाच जणांनी गैरसमजुतीतून खोपोलीच्या पटेल नगरमध्ये एका व्यक्तीला कोयत्याने मारहाण केली होती. खोपोली पोलिस ठाणे हद्दीत शनिवारी ही घटना घडली.
दत्तवाडी गावाच्या हद्दीत मुंबई-पुणे महामार्गालगत चहाच्या टपरीजवळ चहा पिणाऱ्या व्यक्तीला पाच जणांनी पिकअप चालक असल्याच्या गैरसमजातून दारूच्या नशेत शिवीगाळी केली होती. त्यापैकी एकाने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात, उजव्या हाताच्या मनगटावर वार करून जखमी केले.
याप्रकरणी खोपोली पोलिस ठाणे येथे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.