वेस्ट इंडिज क्रिकेट टीमची बांगलादेश दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. यजमान बांगलादेशने विंडीजला एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात शनिवारी 18 ऑक्टोबरला 74 धावांनी पराभूत केलं. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे बांगलादेशला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. त्यामुळे बांगलादेश सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसर्या बाजूला विंडीजसमोर मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे विंडीजसाठी दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे.
मेहदी मिराज दुसर्या सामन्यात बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होप याच्याकडे विंडीजच्या नेतृत्वाची धुरा आहे. उभयसंघातील दुसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
बांगलादेश-विंडीज दुसरा सामना मंगळवारी 21 ऑक्टोबरला होणार आहे.
बांगलादेश-विंडीज दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे होणार आहे.
बांगलादेश-विंडीज दुसरा सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
बांगलादेश-विंडीज दुसरा सामना टीव्हीवर भारतात दाखवण्यात येणार नाही.
बांगलादेश-विंडीज दुसरा सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहायला मिळेल.
बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण 48 सामने खेळवण्यात आले आहेत. या 48 पैकी काही सामन्यांचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत राहिल्याचं आकड्यांवर स्पष्ट होतं.
वेस्ट इंडिजने बांगलादेश विरुद्ध 48 पैकी सर्वाधिक 24 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने 22 सामन्यांमध्ये विंडीजवर पलटवार केला आहे. तर उभयसंघातील 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.
बांगलादेशने पहिल्या सामन्यात विंडीजसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र विंडीजला 150 पार मजल मारता आली नाही. बांगलादेशने विंडीजला 39 ओव्हरमध्ये 133 रन्सवर ऑलआऊट केलं आणि 74 धावांनी सामना जिंकला. आता विंडीज मंगळवारी या पराभवाची परतफेड करणार की बांगलादेश मालिका जिंकणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.