४९ हजारांचा गुटखा वडखळमधून जप्त
अलिबाग ः वडखळ येथे केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने ४९ हजार ८४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. शनिवारी (ता. १८) सायंकाळी केलेल्या कारवाईत एकाला अटक केली आहे. मौजे काराव गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावर काळ्या रंगाच्या दुचाकीवरून गुटखा विकण्यासाठी एक तरुण आला होता. त्याच्या वाहनांची तपासणी केली असता प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्याच्याकडून ४९ हजार ८४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणाची नोंद वडखळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.