अमर घटारे
अमरावती : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर करत दिवाळीपूर्वी हि मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र दिवाळी येऊन गेली असताना देखील अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहे. यात अमरावती जिल्ह्यातील साधारण ३५ टक्के शेतकऱ्यांना अद्याप मदतीची रक्कम मिळालेली नाही.
राज्यात सर्वदूर जोरदार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक उध्वस्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातात शून्य उत्पादन असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली असून मात्र प्रत्यक्षात अनेकांना मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे.
Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखलशासनाने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल; अशी हमी दिली होती. परंतु अमरावतीजिल्ह्यात दिवाळी तोंडावर आली तरी आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांपैकी ३५ टक्के शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे पाठविण्यात आल्या. परंतु संचालित केल्या जाणाऱ्या थेट वितरण प्रणालीवर ताण आल्याने शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित राहिले आहे.
Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना मिळाली मदत
जून ते सप्टेंबर या काळात अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले. यापैकी जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसान झालेल्या १ लाख ७० हजार ७७३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामध्ये शासनाने त्यांच्यासाठी १११ कोटी ४७ लाख २२ हजार रुपयाची तरतूद केली. परंतु अद्याप ती सर्वांपर्यंत पोहोचली नाही. आतापर्यंत १ लाख १३ हजार १३१ शेतकऱ्यांनाच ७२ कोटी ६२ लाख ७२ हजार रुपयांची मदत मिळाली. तर इतर शेतकऱ्यांचे ३८ कोटी ८४ लाख ५६ हजार रुपये अद्यापही वितरित व्हायचे आहे.