वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शेवटच्या जागेसाठी पाकिस्तानला संधी, कसं काय ते समजून घ्या
GH News October 20, 2025 09:12 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या फेरीतील चार पैकी तीन जागा कन्फर्म झाल्या आहे. त्यामुळे एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकूण पाच संघ या जागेसाठी दावेदार आहे. पण भारत आणि न्यूझीलंडला सर्वाधिक संधी आहे. भारत आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. यापैकी दोन्ही सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरी गाठेल यात काही शंका नाही. पण जर काही गडबड झाली तर इतर संघांना संधी मिळेल. खासकरून तळाशी असलेल्या पाकिस्तानलाही संधी मिळणार आहे. यासाठी समीकरण जुळलं म्हणजे झालं. आता हे समीकरण कसं जुळणार ते सर्व भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांच्या कामगिरीवर लक्ष असेल.

पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी?

पाकिस्तानचे या स्पर्धेतील उर्वरित दोन सामने हे दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्याशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवला तर उपांत्य फेरीसाठी दावा ठोकू शकतात. सध्या पाकिस्तानने 5 सामने खेळले असून 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत त्यामुळे दोन सामन्यात प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे आता 2 गुण आणि -1.887 नेट रनरेट आहे. उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर 6 गुण होतील. इतकंच काय नेट रनरेट सुधारण्याची संधी देखील आहे. आता हे 6 गुण आणि भारत-न्यूझीलंड या दोघांची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

पाकिस्तानचं समीकरण असं असेल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 23 ऑक्टोबरला सामना होणार आहे. हा सामना कोणता तरी एक संघ जिंकेल. तेव्हा त्यांचे 6 गुण होतील. आता उर्वरित असलेल्या भारत बांगलादेशशी आणि न्यूझीलंड इंग्लंडशी खेळणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचा पराभव झाला तर गणित 6 गुणांवर येईल. अशा स्थितीत नेट रनरेट हा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे जर असं काही घडलं तर पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी मिळू शकते. पण हे समीकरण जुळून येईल असं वाटत नाही. कारण पाकिस्तानची स्थिती नाजूक आहे. त्यांचा दोन पैकी एका सामन्यात पराभव झाला की विषयच संपला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.