Saudi Arabia Railway Project : सध्या संपूर्ण जगाला प्रगतीचे वेध लागले आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर आज प्रत्येक देश वाहतूक तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी आर्थिक गुंतवणूक करून प्रगतीच्या दिशेने जात आहे. यामध्ये मुस्लीम राष्ट्रदेखील मागे नाहीत. सौदी अरेबिया या मुस्लीम राष्ट्रवाविषयी अनेकांना आकर्षण असते. या देशात नेमके काय चालू आहे? याची सर्वांनाच उत्सुकता लागते. दरम्यान, सध्या हा देश वाळवंटात एक मोठा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे तिथे आमूलाग्र बदल दिसून येणार आहेत. त्यामुळेच सौदी अरेबियाचा हा प्रकल्प नेमका काय आहे? असे विचारले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सौदी अरेबिया आपल्या भूमीत एक हायस्पीड रेल्वे प्रकल्प उभारत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या देशातील रेल्वे अधिक वेगाने धावू लागतील. हा प्रकल्प तब्बल 7 अब्ज डॉलर्सचा असल्याचे बोलले जात आहे. या प्रकल्पाला तिथे लँड ब्रिज असेही म्हटले जात आहे. हा प्रकल्प अस्तित्त्वात आल्यानंतर सौदी अरेबियात व्यापार आणि प्रवासात मोठा बदल होणार आहे. हा प्रकल्प सौदी अरेबिया मिशन 2030 या मोहिमेचाच एक भाग आहे. देशात जास्त लोकसंख्या असलेल्या प्रदेशांना जोडण्यासाठी ही प्रकल्प राबवला जात आहे. सौदी अरेबियातील जेद्दा आणि रियाद ही दोन्ही शहरं या रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून जोडली जातील.
सौदी अरेबियाच्या या प्रकल्पात लाल समुद्र आणि अरबी समुद्र एकमेकांशी जोडले जाणार आहेत. लँड ब्रिज हा प्रकल्प साधारण 1500 किमी लांब असेल. लाल समुद्राजवळ असलेल्या जेद्दा आणि अरबी समुद्राजवळ असलेल्या दम्माम या दोन ठिकाणांना या प्रकल्पाअंतर्गत जोडले जाणार आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाध शहर या प्रकल्पाचे मुख्य केंद्र असेल.
सौदी अरेबियाकडून राबवल्या जाणाऱ्या या लँड ब्रिज प्रकल्पामुळे तिथे बरेच बदल होणार आहेत. सौदी रल्वे कंपनीचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशातील रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार व्हावा यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. सौदी अरेबियात सध्या 5300 किमीचं रेल्वेजाळं आहे. लँड ब्रिज या योजनेमुळे हे रेल्वेजाळं वाढून थेट वाढणार आहे. रेल्वेचं हे जाळं 8000 किमींपर्यंत वाढवण्याचा तेथील सरकारचा मानस आहे. या प्रकल्पामुळे व्यापार, पर्यटनात वाढ व्हावी हेदेखील सौदी अरेबियाचा उद्देश आहे.