जिव्हाळा सेवाश्रमामध्ये दिवाळी फराळाचे वाटप
esakal October 21, 2025 05:45 AM

जिव्हाळा सेवाश्रमामध्ये
दिवाळी फराळाचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २०ः तालुक्यातील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिव्हाळा सेवाश्रमातील वृद्ध आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ देऊन त्यांचा गोडवा द्विगुणित करण्यात आला. समाजसेवक सुरेश बिर्जे यांच्या माध्यमातून गेली दहा वर्षे माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात २५ वृद्ध आहेत. त्यांची सेवा करण्याचे काम बिर्जे परिवार व त्यांचे विश्वस्त करत आहेत.
दरवर्षी या वृद्धांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. दिवाळीसह विविध सण साजरे केले जातात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या सर्व वृद्धांना दिवाळीचा फराळ देत त्या सर्वांचा आनंद द्विगणित करण्यात आला. या फराळाचा त्यांनी आनंदाने व आपुलकीने आस्वाद घेतला. दीपावलीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून, भावनेवरून व्यक्त झाला. आश्रमातील सर्व लाभार्थींनी आनंद व्यक्त करून आश्रमाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.