Lakshmi Puja Muhurat Missed: लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मिस झाला? काळजी करू नका, रात्रीच्या या वेळेतही करता येईल पूजा
esakal October 22, 2025 03:45 AM

What To Do If Missed the Diwali Lakshmi Pujan Muhurat: दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, उत्साहाचा आणि झगमगाटीचा सण असतो. सगळीकडे पसरलेल्या रोहषणाईमुळे आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले असते. तब्बल १४ वर्षांचा वनवास पूर्ण करून श्रीराम अयोध्येत पुन्हा परतले. तेव्हा तिथल्या नागरवासीयांनी आनंदाने संपूर्ण शहर दिव्यांनी उजळवून टाकले होते. त्याचदिवशी त्यांनी डेबी लक्ष्मीची पूजा देखील केली होती. तेव्हापासून दिवाळीत लक्ष्मी पूजनाची मान्यता आहे.

दरवर्षी ठराविक मुहूर्तावर लासखानी पूजन केले जाते. मात्र आजकाल ऑफिसमुळे किंवा काही कारणामुळे तुम्ही ही पूजे मुहुर्ताववर केली नाही तरी चिंता करण्याची गरज नाही. का ते जाणून घेऊया.

Lakshmi Pujan 2025 Story: आपण लक्ष्मीपूजन का करतो? ही आहे त्यामागची आख्यायिका; शुभ मुहूर्तही जाणून घ्या लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त

आज सायंकाळी ६.१० ते रात्री ८.४० या प्रदोष काळात श्री लक्ष्मीपूजन करणे उचित आहे. मात्र या वेळेत तुम्ही पूजा करू शकले नाही तर महानिशीथ काळातही तुम्ही पूजा करू शकता. हा काळ सुरु होईल रात्री ११. ४१ वाजता आणि संपेल मध्यरात्री १२. ३१ वाजता.

या कालावधीतही मनोभावाने आणि श्रद्धेने लक्ष्मी पूजन केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनधान्याची भरभराट होते.

लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य

देवी लक्ष्मी, गणपती आणि कुबेराची मूर्ती, चांदीचे नाणे, धन, केरसुणी, लाल वस्त्र, हळद-कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, कापूर, धूप.

Lakshmi Kubera Pooja 2025: या वर्षी लक्ष्मी-कुबेर पूजन २१ ऑक्टोबरलाच! जाणून घ्या शुभ मुहूर्त लक्ष्मी पूजनाची विधी

- सर्वप्रथम एक पाटावर लाल वस्त्र पसरवा.

- त्यांनतर त्यावर हळद-कुंकू वाहून मध्यभागी देवी लक्ष्मी, गणपती आणि कुबेराची मूर्ती ठेवा.

- एका बाजूला किंवा पाटाच्या मध्यभागी धन(पैसे) ठेवा.

- आता पाटाच्या पुढे केरसुणी ठेवून आणि तिलाही हळदी-कुंकू वाहा.

- त्यांनतर दिव्यात तेल घालून दिवा पेटवा आणि अगरबत्ती आणि धूपही लावा.

- आता सर्व देवतांना हळद-कुंकू वाहून नमस्कार करा आणि बत्तसे आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवा.

- शेवटी देवीला फुल अर्पण करून मंत्रजप करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.