Sarathi Scholarship : छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सुधारणा प्रस्तावाचे काय झाले?
esakal October 22, 2025 10:45 AM

SARTHI Scholarship Reform Kolhapur : छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव पाठवूनही शासन दरबारी अजून काहीच हालचाल झालेली नाही. इयत्ता आठवीसाठी घेतली जाणारी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील लाभार्थी जास्त असल्याने हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.

सारथी शिष्यवृत्ती योजना २०२१-२२ पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी आर्थिक साह्य करणे, हा योजनेमागील उद्देश आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जात संवर्गात ११ हजार ६८२ इतका कोटा मंजूर केला आहे. महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या गटातील सुमारे ३५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतात. त्यांना मर्यादित कोट्यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही. त्यात ही योजना नववी ते बारावीपर्यंत नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे.

प्रति विद्यार्थ्यास दर महिन्याला आठशे रुपयांप्रमाणे वर्षाकाठी ९ हजार ६०० रुपये मिळतात. ही योजना साडे तीन लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ही स्थिती लक्षात घेता त्यात सुधारणा केली असून, प्रस्तावित योजनेत नववी ते बारावीच्या वर्गात नियमित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गुणवत्ता टिकवावी लागणार आहे. प्रत्येक इयत्तेत प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक मिळवून गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. सुधारित योजनेमुळे जेईई, गेट, नीट, नाटा, सेट परीक्षांना सामोरे जाऊन यशस्वीतांचे प्रमाण वाढणार आहे.

Kolhapur Killing Mystery : कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं, वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

प्रस्तावित योजनेची वैशिष्ट्ये ...

राज्यातील सर्व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार

नववी ते बारावीच्या वर्गात, शाळेत वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

आठ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

सर्व जिल्ह्यांना प्रतिनिधीत्त्व मिळणार

Kolhapur Killing Mystery : कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं, वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजनेतील उणिवा

आठवीत एकदाच एनएमएमएस परीक्षा होते.

त्या आधारावर ९ ते १२ पर्यंत सलग ४ वर्षे ९ हजार ६०० रुपये दिले जातात.

पुढील वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी मूल्यमापन होत नाही.

नववीत शिष्यवृत्तीसाठी गुणवत्तेची अट नाही.

दहावी व अकरावीसाठी ६० टक्के गुणांची अट

बारावीसाठी गुणांची अट नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.