Mumbai Pollution: वायुप्रदूषणाने घुसमट! बीकेसीमध्ये गुणवत्ता निर्देशांक पोहोचला ३३५वर
esakal October 22, 2025 10:45 AM

मुंबई : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता (एक्यूआय) सोमवारी (ता. २०) चिंताजनकरीत्या घसरली असून, अनेक ठिकाणी ती ‘अत्यंत खराब’ या श्रेणीत नोंदविण्यात आली. काही भागांमध्ये एक्यूआय ३००च्याही पुढे गेल्याने आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे.

दिवाळीतफटाक्यांचा अविचारी वापर, बांधकाम प्रकल्पातून होणारे प्रदूषण, वाहनांमधून होणारे प्रदूषण, कचरा जाळणे आणि स्थिर हवामान यामुळे प्रदूषण अचानक धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. एक्यूआयची आकडेवारी मुंबई महानगर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि आयआयटीएमने सोमवारी दिली. वायुप्रदूषण, बीकेसी, गुणवत्ता निर्देशांक, AQI, प्रदूषण पातळी, पर्यावरण, आरोग्य धोका, धुके, हानिकारक हवा, PM2.5, PM10, हवा निरीक्षण, विषारी हवा, शहरी प्रदूषण, पर्यावरण सूचना, शहराची हवा गुणवत्ता, श्वसन समस्या, प्रदूषण वाढ, हवेचा निर्देशांक, प्रदूषण नियंत्रण, धुके सूचना, प्रदूषण डेटा, शहराचे पर्यावरण, प्रदूषण चिंता, वातावरण गुणवत्ता, हवा प्रदूषण, अहवाल, सार्वजनिक आरोग्य, हवा सुरक्षा, पर्यावरण निरीक्षण

, तर देवनार, अंधेरी आणि माझगावमध्ये एक्यूआयने ‘धोक्याची मर्यादा’ ओलांडली होती.

Mumbai News: बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार, महापालिका आयुक्तांसोबतच्या भेटीत मागणी मान्य होणार? मुंबईत कोठे किती प्रदूषण?

मुंबईतील सर्वाधिक प्रदूषित हवा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात नोंदवली गेली आहे, जिथे एक्यूआय तब्बल ३३५ इतका नोंदविला गेला. कुलाबा (२८२), देवनार (२७२), चकाला (२६७), माझगाव (२५४) आणि विले पार्ले पश्चिम (२५२) या भागांमध्येही हवा ‘अत्यंत खराब’ श्रेणीत होती.

उपनगरांतही स्थिती चिंताजनक

नेरूळ (२४४), बोरिवली पूर्व (२३९), खेरवाडी बांद्रा पूर्व (२१९), तोंडरे तळोजा (२१८), मालाड पश्चिम (२१७), भायखळा (२१६) आणि वरळी येथील सिद्धार्थनगर (२०९) या ठिकाणीही हवा अत्यंत दूषित नोंदली गेली.

तज्ज्ञांचा सल्ला
  • सकाळ-संध्याकाळ बाहेर पडणे टाळा.

  • मास्कचा वापर करा.

  • घरात हवा शुद्ध करणारी झाडे ठेवा.

  • लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.

Mumbai News: पर्यटकांचा होणार प्रदूषणमुक्त प्रवास! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार नव्या ई-बग्गी काही ठिकाणी समाधानकारक स्थिती

चेंबूर (१५७), घाटकोपर (१९१), कांदिवली (१६०), शिवडी (१५०) आणि शिवाजीनगर (१४०) या भागांत प्रदूषण मध्यम स्वरूपाचे असले तरी हवेचा दर्जा समाधानकारक नाही. काही ठिकाणी मात्र हवा तुलनेने स्वच्छ असल्याचे आढळून आले. यामध्ये कुर्ला (१२२), महापे (१०५), सायन (११०) आणि वसई पश्चिम (९२) येथे एक्यूआय तुलनेने कमी नोंदविला गेला.

दिल्लीत प्रदूषण वाढले

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषण रोखण्यासाठी श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला. काल दिल्लीतील हवेची गुणवत्ता ३०० एक्यूआयपर्यंत खालावल्याने या उपाययोजना लागू केल्या जात आहेत. ‘ग्रॅप’च्या वेळापत्रकानुसार हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कारवाई करावी, यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे नागरिकानीही हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी सहकार्य करावे, खासगी वाहनांचा वापर कमीत कमी करावा आणि सार्वजनिक वाहतूक वापरावी, असे आवाहन केले आहे.

दिल्लीतील हवेतील प्रदूषणरोखण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या उपसमितीची काल बैठक होऊन तात्काळ प्रभावाने ग्रॅप या श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा (ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन) दुसरा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. उप-समितीच्या म्हणण्यानुसार कालपासूनच दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली असून दुपारी चारला हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटि इंडेक्स – एक्यूआय) २९६ आणि सायंकाळी सातला ३०२ नोंदविण्यात आला होता.

पुढील काही दिवसांत हवेतील गुणवत्तेत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.यात धूळ नियंत्रणासोबतच, बांधकामे थांबविणे तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना लागू करण्यात येत आहेत. कारखान्यातून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी कठोर उपाय लागू केले जाणार आहेत. या अंतर्गत ग्रॅप टू श्रेणीत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांनुसार निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक ठिकाणी डिझेल जनरेटरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अर्थात आपत्कालीन सेवांसाठी डिझेल जनरेटरच्या वापरास सूट असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.