निसर्गाचा चमत्कार! एकाच वेळी अनेक रंग बदलणारे दुर्मिळ कबुतर तुम्ही पाहिले का?
esakal October 22, 2025 10:45 AM

Nicobar Pigeon

दुर्मिळ कबुतर

एकाच वेळी अनेक रंग बदलणारे दुर्मिळ कबुतर कोणते आहे याचे नाव काय आहे आणि हे कुठे अढळते जाणून घ्या.

Nicobar Pigeon

प्रजातीचे नाव

याला प्रामुख्याने निकबार पिजन (Nicobar Pigeon) म्हणून ओळखले जाते, जे जगातील सर्वात रंगीत कबुतरांपैकी एक आहे.

Nicobar Pigeon

नैसर्गिक गुणधर्म

या पक्ष्याच्या पिसांमध्ये असणाऱ्या इरिडेसेन्स (Iridescence) या नैसर्गिक गुणधर्मामुळे रंग बदलताना दिसतात.

Nicobar Pigeon

रंगांची चमक

इरिडेसेन्समुळे, प्रकाशाच्या कोनानुसार पिसांवर हिरवा, निळा, जांभळा, सोनसळी आणि तांबूस अशा अनेक रंगांची धातूसारखी (Metallic) चमक येते.

Nicobar Pigeon

डोडो

हा पक्षी नामशेष झालेल्या डोडो (Dodo) पक्षाचा सर्वात जवळचा जिवंत नातेवाईक मानला जातो, ज्यामुळे त्याचे महत्त्व वाढते.

Nicobar Pigeon

मूळ अधिवास

हे कबूतर मुख्यतः निकोबार बेटांसह (भारत) दक्षिण-पूर्व आशियातील आणि पॅसिफिक महासागरातील लहान बेटांवरील जंगलात आढळते.

Nicobar Pigeon

संरक्षण स्थिती

अति शिकार आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश यामुळे या पक्ष्याची संख्या कमी होत आहे, त्यामुळे ते धोक्यात येण्याची शक्यता (Near Threatened) असलेली प्रजाती म्हणून सूचीबद्ध आहे.

Nicobar Pigeon

कबुतरांचे वैशिष्ट्य

इतर सामान्य कबुतरांपेक्षा याच्या पिसांमध्ये ही खास रचना असल्यामुळे सूर्यप्रकाशात ते अधिक आकर्षक आणि चमकीले दिसते.

Nicobar Pigeon

संवर्धनाची गरज

त्यांच्या घटत्या संख्येमुळे, या दुर्मिळ आणि सुंदर प्रजातीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.

Bird Nest in House

Bird Nest in House : घरात पक्ष्यांनी घरटं बांधलं तर ते शुभ की अशुभ? जाणून घ्या महत्त्व येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.