आळेफाटा, ता. २१ ः डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, सुवर्णयुग युवा मंच आळे व ज्येष्ठ नागरिक संघ संतवाडी, कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आळे (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉ. ओंकार पाटील व त्यांची सर्व टीम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके, उपाध्यक्ष किसन जाधव, सचिव शिवाजी कुऱ्हाडे, सहसचिव नामदेव दिघे, माजी सैनिक जालिंदर माळी, सखाराम कुऱ्हाडे, नागेश कुऱ्हाडे, किसन बहिरट, हिरुजी कुऱ्हाडे, पांडुरंग गाढवे, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या शिबिरात १०१ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व ४८ नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.