पारगाव, ता. २१ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयात उत्साहात बुधवारी (ता.२१) लक्ष्मीपूजन व वहीपूजन करण्यात आले. भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन पार पडले.
संगणकीय युगातही भीमाशंकर साखर कारखानाच्या प्रशासनाकडून पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी संचालक अशोक घुले, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, प्रिया बाणखेले, सचिव रामनाथ हिंगे, राजेश वाकचौरे, अनिल बोंबले, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, वसंत जाधव, वामनराव जाधव, संजय बाणखेले व कर्मचारी उपस्थित होते. पूजनानंतर कामगारांनी फटाके वाजवून दिवाळीचा आनंद लुटला.