जोगेश्वरी पूर्वेकडील आदर्श मेघवाडी सोसायटीत दिवाळीच्या दिवशी भीषण आग
जळता दिवा सोफ्यावर पडल्याने घर जळून खाक
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
आगीमध्ये घराचे मोठे नुकसान
दिवाळीमध्ये आगीच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी फटाक्यांमुळे तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आगीच्या घटना घडल्या. नवी मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीमध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग लागली. लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री ही घटना घडली. जळता दिवा सोफ्यावर पडल्यामुळे ही आग लागली आणि यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील आदर्श मेघवाडी सोसायटीत मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आगीमध्ये आठव्या मजल्यावरील एक घर पूर्णतः जळून खाक झाले. जळता दिवा सोफ्यावर पडल्याने आग लागली असून काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले.
Thane Fire : ठाण्यात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी 3 ठिकाणी आग, हिरानंदानी इस्टेटमध्ये ३१ मजल्यावर आगीचा भडकास्थानिक रहिवाशांनी इमारतीतील फायर सिस्टीम बंद असल्याचा आरोप केला असून अलार्म वाजला नसल्याने आग उशिरा लक्षात आल्याचे सांगितले. आमदार अनंत नर यांनी घटनास्थळी भेट देत विकासकावर चौकशीची मागणी केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा विकासकांच्या जबाबदारीचा आणि सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Vashi Fire : दिवाळीत संसाराची राखरांगोळी, वाशीतील आगीत ४ जणांचा मृत्यूदरम्यान, नवी मुंबईतल्या वाशीमध्ये इमारतीला लागलेल्या आगीमध्ये चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये ८० वर्षांची वृद्ध महिला, ४० वर्षीय पूजा राजन, ४० वर्षीय सुंदर कृष्णन आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी वेदिका यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. रहेजा रेसिडेन्सीमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजता ही घटना घडली. या घटनेमध्ये १० जण जखमी झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली.
Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोरनवी मुंबईतील कामोठ्यातील सेक्टर -३६ मध्ये आगीची घटना घडली. अंबे श्रद्धा इमारतीमध्ये आग लागली यामध्ये मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला. रेखा शिशोदिया आणि पायल शिशोदिया अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावं होती. सिलेंडरचा स्फोट होऊन ही घटना घडली. या घटनेमुळे घराचे देखील मोठे नुकसान झाले.
AC Bus Fire: दिवाळीसाठी गावाकडे निघाले, वाटेत बसने पेट घेतला; जवानासह ५ जणांचं कुटुंब जिवंत जळाले