Sangli BJP Politics : इस्लामपूर येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक येथील सर्किट हाऊस येथे झाली. महायुती म्हणून एकदिलाने निवडणूक लढविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. शहरातील विकास, नागरिकांचा विश्वास आणि स्थिर प्रशासन या तीन मुद्द्यांवर महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
बैठकीला आमदार सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, विकास आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक विक्रम पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक संजय कोरे, जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगरसेवक वैभव पवार, माजी नगरेसवक विश्वनाथ डांगे, माजी नगरसेवक विजय कुंभार, शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत विभागनिहाय चर्चा झाली. स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती देणे, पक्षांमधील सुसंवाद वाढवणे, तसेच आगामी निवडणुकीसाठी एकत्रित प्रचार आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून ईश्वरपूर नगरपालिकेत महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला.
Tragic Accident Kolhapur : चुकीच्या दिशेने आयशर टेम्पो आल्याने कोल्हापूर –राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमीमहायुतीचे ऐक्य व समन्वय पाहता नगरपालिका निवडणुकीत महायुतीची ताकद अधिक प्रभावी ठरणार असून, शहराच्या विकासासाठी स्थिर व पारदर्शक नेतृत्व उभे राहील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.