swt212.jpg
99948
बुधवळे ः गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला.
‘गडकिल्ले’ प्रतिष्ठानतर्फे
बुधवळे येथे ‘दीपोत्सव’
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २१ः गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या मावळ्यांनी नरक चतुर्दशी दिवशी ‘पहिला दिवा आमच्या राजांना’ हा उपक्रम बुधवळे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रज्वलित करत दीपोत्सव साजरा केला. यावेळी प्रथमेश चव्हाण, ओंकार गोसावी, वरद जोशी, हर्षद मडवळ, प्रसाद गुरव, राजू घागरे, स्वप्नील शिर्सेकर, नारायण पाताडे, उत्तम वाघ, कृष्णा साटम उपस्थित होते.
..................
swt213.jpg
N99949
माड्याचीवाडी ः जिव्हाळा सेवाश्रमामध्ये राधारंग फाउंडेशनने दीपावलीनिमित्त आश्रमास भेट दिली.
जिव्हाळा सेवाश्रमामध्ये
''राधारंग''तर्फे फराळ वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमामध्ये राधारंग फाउंडेशन या संस्थेने दीपावलीनिमित्त आश्रमास भेट दिली. यावेळी फाउंडेशनच्या फाउंडेशन सदस्यांनी लाभार्थींना जीवनावश्यक वस्तूंचे व फराळाचे वाटप केले. जिव्हाळा सेवाश्रमाचे अध्यक्ष सुरेश उर्फ दादा बिर्जे यांनी चालविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. गोशाळेबाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी राधारंग फाउंडेशनच्या अरुणा सामंत, स्वाती वालावलकर, प्रथमेश नाईक, पूर्वा नाईक, अमेय देसाई, सचिन सामंत, संतोष सामंत, ‘जिव्हाळा’चे अध्यक्ष सुरेश बिर्जे, जयप्रकाश प्रभू, गितांजली बिर्जे, प्राजक्ता केळुसकर आदी उपस्थित होते. संस्थाध्यक्षांनी राधारंग फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतूक करून आभार मानले.