JEE Main 2026 Exam Timetable Schedule: इंजिनिअर होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी जेईई मेन्स ही परीक्षा देणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हालाही इंजिनिअर व्हायचं असेल, तर तुमच्यासाठी ही एक महत्वाची अपडेट आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE Main 2026 परीक्षेच्या दोन्ही सत्रांचे वेळापत्रक जाहीरकेले असून, ऑनलाइन अर्ज लवकरच सुरू होणार आहेत. अधिक माहितीसाठी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Bhau Beej Gifts: भाऊबीजेसाठी गिफ्ट शोधताय? लाडक्या भावासाठी ‘या’ भन्नाट आयडिया तुमच्यासाठीच! JEE Main का आहे खास?दरवर्षी १० लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात. ही परीक्षा IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पहिले पाऊल आहे. देशातील टॉप अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी आहे.
परीक्षेचे वेळापत्रकसेशन १: २१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६
सेशन २ : १ एप्रिल ते १० एप्रिल २०२६
ही परीक्षा CBT (Computer Based Test) स्वरूपात घेतली जाणार असून दोन भाग मध्ये विभागी केली आहे.
पहिली फेरी : सकाळी ९ ते दुपारी १२
दुसरी फेरी : दुपारी ३ ते संध्याकाळी ६
पात्रता व महत्वजेईई मेन्स ही देशातील नामंकित नीट, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे. याच परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्ससाठी पात्रता मिळते , जी आयआयटी मध्ये प्रवेशासाठी आवश्यक असते.
परीक्षेचे स्वरूपJEE Main 2026 मध्ये दोन पेपर असतील:
पेपर 1: बी.ई. / बी.टेक कोर्ससाठी
पेपर 2: बी.आर्किटेक्चर (B.Arch) व बी.प्लॅनिंग (B.Planning) कोर्ससाठी
Bhau Beej Travel: भाऊबीजच्या दिवशी भावाला घेऊन जा 'या' खास ठिकाणी; आठवणी ठरतील खास! ऑनलाइन अर्ज कसा कराल?अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
अधिकृत वेबसाइटवर जा: jeemain.nta.nic.in
“JEE Main 2026 Registration” लिंकवर क्लिक करा
नाव, मोबाईल, ईमेल वगैरे माहिती भरून नोंदणी करा
लॉगिन करून अर्ज फॉर्म पूर्ण भरा
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरा
फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट घेऊन ठेवा
काय ठेवावे लक्षात?परीक्षा ऑनलाइन (CBT) स्वरूपात होईल
प्रश्नपत्रिका इंग्रजी, हिंदीसह काही प्रादेशिक भाषांमध्ये असेल
चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग असेल
पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयातील प्रश्न असतील