एका शेअरवर थेट 40 रुपयांचा लाभांश मिळवण्यासाठी शेवटची संधी; बाजार उघडताच गुंतवणुकदार खरेदीच्या तयारीत
ET Marathi October 22, 2025 07:45 PM
Accelya Solutions India Limited या बीएसई स्मॉलकॅप कंपनीने आपल्या भागधारकांना मोठे बक्षीस जाहीर केले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 साठी प्रत्येक शेअरवर 40 रुपये (400%) चा अंतिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.



लाभांशासाठी महत्त्वाच्या तारखाया लाभांशासाठी पात्र ठरण्यासाठी गुंतवणूकदारांना त्यांच्या डिमॅट खात्यात Accelya Solutions चे शेअर्स असणे आवश्यक आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख 24 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे, जी एक्स-डिव्हिडंड तारीख देखील आहे. ज्या भागधारकांना लाभांश मिळवायचा आहे. त्यांना T+1 सेटलमेंट प्रणाली प्रमाणे म्हणजेच एक दिवस आधी 23 ऑक्टोबरला शेअर्सची खरेदी करणे आवश्यक ठरेल. लाभांशाची रक्कम 27 नोव्हेंबर 2025 रोजी थेट भागधारकांच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा केली जाईल. याच वर्षी जानेवारी महिन्यातही या शेअरने 50 रुपयांचा लाभांशासाठी एक डिव्हिडंड ट्रेड केला होता.



गुंतवणूकदारांसाठी आकर्षक परतावाकंपनीचा शेअर सध्या 1,450 रुपयांवर ट्रेड करीत आहे. 40 रुपये लाभांश दिल्याने सुमारे 6.2% चे लक्षणीय लाभांश उत्पन्न (dividend yield) मिळत आहे. अंदाजे 2,239 कोटी रुपये बाजार भांडवल असलेली ही कंपनी, उत्पन्न-केंद्रित गुंतवणूकदारांसाठी आकर्षक परतावा देत आहे. यामुळे कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करता भागधारकांचे मूल्य वाढण्यास मदत होते.



कंपनीची आर्थिक स्थितीAccelya Solutions प्रामुख्याने प्रवास आणि वाहतूक क्षेत्रासाठी सॉफ्टवेअर आणि सल्लागार सेवा पुरवते. कंपनी सातत्याने मजबूत कमाई करत असून नियमित लाभांश वाटप करत आहे. मागील एक वर्षात या शेअरमध्ये 12.28% ची घट झाली असली तरी, तीन वर्षांच्या कालावधीत त्याने 42.33% ची दीर्घकालीन वाढ दर्शविली आहे. कंपनीची ही घोषणा स्थिर आर्थिक कामगिरी आणि गुंतवणूकदारांना सतत मूल्य परत करण्याच्या तिच्या धोरणाचे दर्शन घडवते. ज्या गुंतवणूकदारांना लाभांशाचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी 24 ऑक्टोबर 2025 या रेकॉर्ड तारखेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.