- rat२१p५.jpg-
२५N९९९१६
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा महिला व्हॉलीबॉल संघ
‘गोगटे’चा महिला
व्हॉलीबॉल संघ विजयी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल संघाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत झालेल्या कोंकण विभागाच्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक आणि सांघिक विजेतेपद पटकावले आहे.
विभागीय स्पर्धा १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान जीआयटी घरडा इंजिनिअरिंग महाविद्यालय, लवेल यांच्या सहकार्याने झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि सेवक यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. या विजयी संघात मधुरा राऊत, सानिका लिंगायत, प्रसिद्धी सोनावणे, श्वेता खोडे, कृणाली सावंत, श्रेया सारंग, प्रियंका भोंगले, तनिष्का शिरधनकर, स्वरा शिंदे, श्रावणी शिंदे, शृजेश्वरी आवळकर, स्नेहा कदम, समीक्षा धनवे, श्रावणी शेलार यांचा समावेश होता.