ठाणे: ‘‘विरोधकांना कितीही सुरसुरी-लवंग्या फोडू द्यात. आम्ही काम करतो आणि जनता त्याचे उत्तर मतपेटीतून देते. विरोधकांना आता पराभव दिसत असल्यानेच ते निवडणूक आयोग, ईव्हीएम, महायुतीला दोष देत फिरत आहेत. महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठाम उभी आहे. त्यामुळे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता येईल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात व्यक्त केला.
Electric shocks:'फ्लेक्स लावताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू'; सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद येथील घटना..ठाण्यातील रहेजा गार्डन येथील दिवाळी पहाट कार्यक्रमानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘विरोधक दररोज आरोपांचे फटाके फोडतात. त्यांच्या त्या फुसक्या लवंग्यांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही.
आम्ही कामगिरीच्या बॉम्बने विरोधकांचा धुरळा उडवणार आहोत. राज्यातील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आमचे लक्ष विकासावर आहे आणि विरोधकांचे काम केवळ आरोप, टीका करण्यावर आहे,’ असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
Anil Desai: ‘माण’मधील सर्व निवडणूक ताकदीने लढवणार: अनिल देसाई; अजित पवार यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम शेतकऱ्यांच्या पाठीशी!‘‘शेतकरी संकटात असताना शिवसेना आणि महायुती सरकार त्यांच्यासोबत उभे आहे. आम्ही दिलेले वचन पाळले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा पैसा पोहोचत आहे,’’ असे शिंदे यांनी सांगितले.