Sangli Mobile Dispute Killing : मोबाईल परत घेतल्याच्या कारणावरून जावेद मुबारक अत्तार (वय ४२) याने जयंत विश्वास भगत (वय ४०, दोघे खानापूर) या तरुणाचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, खुनी हल्ल्यानंतर पळून गेलेला अत्तार यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
त्यास आज विटा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यास दोन दिवस पोलिस कोठडीचा आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी (ता. २०) रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना खानापूर येथे विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर एका दुकानासमोर घडली. याबाबत मृताची आई रंजना विश्वास भगत (वय ६५, खानापूर) यांनी आज विटा पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले, की जावेदचा मोबाईल बंद पडल्याने त्याने जयंत भगतचा मोबाईल घेतला होता. मात्र घेतलेला मोबाईल जयंत जावेदला परत मागत होता. परंतु जावेद मोबाईल परत देत नव्हता. जयंतने जावेदच्या घरातून मोबाईल आणला. त्याचा राग मनात धरून जावेदने काल रात्री पावणेआठच्या सुमारास खानापूर येथे जयंतच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करून खून केला.
Kolhapur Birthday Party : वाढदिवसाच्या पार्टीत मित्रालाच भोसकले, बीअरची बाटलीही घातली डोक्यात अन्अत्तार घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांनी शोधमोहीमराबवून त्यास पकडले. त्यास अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यास आज विटा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोन दिवस पोलिस कोठडीचा आदेश दिला. पोलिस निरीक्षक फडतरे अधिक तपास करत आहेत.