सचिन बनसोडे, अहिल्यानगर
अहिल्यानगरमधील संगमनेर मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय. याच मुद्द्यावरून आता थोरात विरुद्ध विखे - खताळ सामना रंगताना दिसतोय. मतदार यादीत साडेनऊ हजार नावांमध्ये घोळ असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर मंत्री विखे पाटील आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे आमदार अमोल खताळ यांनी त्यांना प्रतिउत्तर दिलंय.
संगमनेरच्यामतदार यादीत मोठा घोळ असल्याचा दावा करताना या नावांची कोणतीही पडताळणी करण्यात आली नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तहसीलदार म्हणतात नावं वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही. एका बाजूला म्हणतात चुका दुरुस्त करू आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात आम्हाला अधिकार नाही. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा बनवाबनवीचा कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी केलाय.
Maharashtra Politics : भाजपच्या ऑपरेशन लोटसला ब्रेक लावण्यासाठी अजित पवारांची मोठी खेळी; थेट मंत्री मैदानात उतरवलाबाळासाहेब थोरातयांनी केलेल्या दाव्यानंतर त्यांचा पराभव करणारे आमदार अमोल खताळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरात आमदार असतानाच संगमनेर मतदारसंघात अनेक बोगस मतदार नोंदले गेले. पालिका निवडणुकीपूर्वी देखील थोरात यांच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आलाय. महायुतीकडून आम्ही त्यासंदर्भात हरकती नोंदवल्या आहेत. गेली ४० वर्षे इथे बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या बगलबच्च्यांची दहशत होती. त्यांना विकास करता आला नाही. मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे संगमनेर मतदारसंघातील सामान्य जनतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डावआगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव होणार असल्याने भितीपोटी बोगस मतदार आणि याद्यांबाबत आरोप सुरू आहेत. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही त्यामुळे अशा लोकांना जनता त्यांची जागा दाखवण्याचे काम करते, असे देखील अमोल खताळ यांनी सांगितले. तर, ४० वर्षात बाळासाहेब थोरातांनी मतदार वाढवूनही त्यांचा पराभव झाला आणि त्याचे खापर मतदारांवर फोडताय. या सगळ्या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.
Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर