Kolhapur–Radhanagari Road Accident : (सुहास जाधव), कोल्हापूर–राधानगरी मार्गावरील कौलव ते सिरसे दरम्यान मंगळवारी (ता. २१) दुपारी १२ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. आयशर टेम्पोने मोटरसायकलला जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (एमएच १४ डीएम ९८३४) हा राधानगरीकडून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने जात होता. दरम्यान, भोगावतीकडून राधानगरीकडे चार जण मोटरसायकलवरून जात होते. कौलव येथील श्री दत्त मंदिराशेजारी टेम्पो उलट्या दिशेने आल्याने त्याने मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात मोटरसायकलवरील श्रीकांत बाबासो कांबळे आणि त्यांची पुतणी कौशिका सचिन कांबळे (दोघे रा. तरसांबळे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत यांची बहिण दिपाली गुरुनाथ कांबळे व तिचा मुलगा अथर्व गुरुनाथ कांबळे (रा. शेंडूर, ता. कागल) गंभीर जखमी झाले. दोघांनाही तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.
Kolhapur Crime News : वाहनांचे नंबर प्लेट आणि स्टिकर बदलून महिलांची रेकी करून दागिने चोरायचे, पण पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केलाअपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे कोल्हापूर–राधानगरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.