Diwali Padwa 2025 Marathi Wishes: दिव्यांचा सण दिवाळी पाच दिवस साजरा केला जातो. आज दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. हा फक्त सण नाही तर पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा दिवस आहे. या दिवशी घरात सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण राहते. या दिवशी महिला पतीला ओवाळून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी मराठीतून खास शुभेच्छा पाठवू शकता.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
नात्यात आपुलकी वाढू दे
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
आभाळी सजला मोतियांचा चुडा
दारी दिव्यांचा सोनेरी सडा
आता दिवाळसण आनंदात लुटूया
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
धनाटी पूजा, यशाचा प्रकाश
किर्तीचे अभ्यंगस्नान
मनाचे लक्ष्मीपूजन
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
नवा सुगंध-नवा ध्यास,
नव्या रांगोळीची नवी आरास
स्वप्नातले रंग नवे
आकाशातले असंख्य दिव्
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!