-अरविंद मोटे
सोलापूर : दिवाळीतील सुट्ट्या रद्द होतात म्हणून वाघाच्या हल्ल्यास तरसाचा हल्ला असल्याचे पंचनामा करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांकडून ठरवले जात आहे. एका वन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या मागील गौडबंगाल सांगितले. त्यामुळे वन विभागाने सुट्टीसाठी केलेला प्रताप समोर आला. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवारामलिंग अभयारण्य परिसरात अधिवास तयार केलेल्या वाघाचा एक महिन्यापासून थांगपत्ता नाही. यापूर्वीही तीन-तीन महिने वाघ गायब होता. सध्या वाघ अज्ञातस्थळी असतानाच वैराग परिसरात गायींवर वन्यप्राण्यांकडून हल्ले झाले. शनिवारी (ता. १८) मध्यरात्री तडवळे (या.) येथील सत्यवान जाधव यांच्या गीर गायीवर हल्ला झाला असून यामध्ये चार ते पाच वर्षे वयाची गीर गाय ठार झाली आहे. त्याच रात्री नांदणी (ता. बार्शी) येथील शेतकरी आदेश गायकवाड यांच्या जर्सी गाय अज्ञात वन्य प्राण्यांने फाडली असून दोन्ही ठिकाणी वाघ किंवा बिबट्याचे ठसे आढळून आलेले नाहीत, असा वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
परंतु, वैराग परिसरातील झालेले हल्ले हे मोठ्या जनावरांवर झाले असून असे हल्ले वाघच करू शकतो. पूर्ण वाढ झालेल्या इतक्या मोठ्या जनावरांवर झालेले हल्ले पाहता हे हल्ले वाघाचे असावेत, अशी शंका पर्यावरणप्रेमींतून व्यक्त केली जात आहे. मात्र, वन विभागाने केलेल्या पाहणीत कुठेही वाघाच्या पायाचे ठसे आढळलेले नाहीत. दुसरीकडे शिकारीच्या पद्धतीवरून हे हल्ले तरसाचे असावे, असे वन विभागाचे म्हणणे आहे.
वैराग परिसरातील हल्ले नेमके कोणत्या प्राण्यांचे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. यासाठी वन मजुराकरवी गस्त सुरू करण्यात आली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री एकटे बाहेर जाऊ नये. उघड्यावर जनावरे बांधू नयेत. लहान मुलांना एकटे सोडू नये.
- अलका करे, वन परिक्षेत्र अधिकारी, बार्शी
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!दोन वर्षांपेक्षा मोठी जनावरे तरसाने ठार केल्याचे ऐकलेले नाही. जनावरे मोठी असतील तर वाघच असू शकतो. मुळात तरस हा मेलेली जनावरे खाणारा प्राणी आहे, त्याला निसर्गाचा स्वच्छता रक्षक म्हणतात. मेलेले न मिळाल्यास लहान वासरे ठार करतो.
- भरत छेडा, माजी मानद वन्यजीव रक्षक