बिग बॉस 14 मधील प्रसिद्ध स्पर्धक पवित्रा पुनिया ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या आयुष्यात प्रेमाची पुन्हा एंट्री झाली असून तिने साखरपुड्याची बातमी सर्वांसोबत शेअर केली. अभिनेता इजाज खानसोबत ब्रेकअप झाल्यानतंर काही दिवसांनीच पवित्राला नवा जोडीदार मिळाला आहे. (Photos – Social Media / pavitrapunia)
रिपोर्ट्सनुसार, पवित्रा ही मुंबई-बेस्ड बिझनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याने सुद्रकिनारी तिला खास पद्धतीने प्रपोज केलं, त्याचे काही फोटोज तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. लाल ड्रेसमध्ये सुदंर दिसणारी पवित्रा ही तिच्या जोडीदारासोबत प्रेमात आकंठ बुडालेली दिसली.
39 वर्षीय पवित्रा पुनियाच्या भावी पतीने तिला समुद्रकिनाऱ्यावर गुडघ्यावर बसून प्रपोज केले. त्यानंतर पवित्राने तिच्या बोटात चमकदार हिऱ्याची अंगठी फ्लाँट केली.
अनेक फोटो तिने शेअर केले, पण पवित्राने एकाही फोटोत तिच्या जोडीदाराचा चेहरा मात्र दाखवलेला नाही. ❤️ Locked in 🧿 love made it official – अशी कॅप्शनही तिने या फोटोंसोबत लिहीली आहे.
सोशल मीडियावर पवित्राचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी त्यावर हजारो लाईक्स आणि कमेंट्स करत पवित्रावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मी पुन्हा प्रेमात पडले आहे. यावर्षीची दिवाळी खूप खास आहे, कारण मी यंदा सण कुटुंबियांसोबत साजरा करणार आहे. तो ( भावीपती) खूप चांगला आणि दयाळू व्यक्ती आहे, असं पवित्राने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याचं नाव काही तिने अजून जाहीर केलेलं नाही.
पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खानची प्रेमकहाणी बिग बॉस 14 च्या घरात सुरू झाली, जिथे त्यांची केमिस्ट्री, जोरदार वाद आणि भावनिक क्षणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या शो दरम्यान, एजाजने पवित्रावरील प्रेम व्यक्त केलं होतं.
हा शो संपल्यानंतरही त्या दोघांचं नातं मजबूत होतं आणि इजाजने पवित्राची त्याच्या कुटुंबियांशी देखील भेट करून दिली होती. 2022 पर्यंत ते लिव्ह-इनमध्ये होते. मात्र 2024 च्या सुरूवातीला त्यांचे मार्ग वेगळे झाले. फेब्रुवारी 2025 मध्ये पवित्राने त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केली होती.