Marathi Entertainment News : संपूर्ण देशाला तिच्या तालावर नाचवणारी धकधक माधुरी दीक्षित तिच्या एव्हरग्रीन सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पण माधुरीच्या लहानपणी एक अशी घटना घडली होती ज्यामुळे ती जीवानिशी वाचली. सोशल मीडियावर माधुरीने सांगितलेली ही आठवण चर्चेत आहे.
माधुरीने माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत ही घटना सांगितली. लहानपणी घडलेल्या घटनेमुळे माधुरीला कायमचा मानसिक धक्का बसला. काय घडलेलं नेमकं जाणून घेऊया.
माधुरीने सांगितलं की,"लहानपणी मैत्रिणीसोबत दिवाळी साजरी करत असताना एका मुलाने माझ्या हातात असलेला फटाका पेटवला. यामुळे त्या फटाक्याची आग थेट माझ्या केसाला आग लागली आणि माझे सगळे केस जळले. त्यामुळे अनेक दिवस मला टक्कल ठेवावं लागलं होतं. मी घराबाहेर पडत नव्हते. "
View this post on InstagramA post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)
"देवाच्या कृपेने माझ्या चेहऱ्याला काही झालं नाही. नाहीतर आज मी अभिनेत्री नसते. त्या घटनेनंतर मी आतापर्यंत कधी फटाके वाजवले नाहीत. मी त्यांच्यापासून दूर राहते. " असं ती पुढे म्हणाली.
सोशल मीडियावर माधुरीने सांगितलेली घटना चर्चेत आहे. अखेरचं माधुरीने मजा माँ सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर ती अजून नव्या सिनेमात काम केलं नाहीये.
त्या चर्चा खऱ्या ठरल्या! सुयश आईवडिलांसोबत घरी मात्र आयुषी माहेरच्यांसोबत साजरी करतेय दिवाळी; फोटो चर्चेत